
पंचायत समिती दर्यापूर
Panchayat Samiti Daryapur
महाराष्ट्र शासन



पंचायत समिती दर्यापूर, आपले स्वागत करीत आहे.
महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम १९६१ अन्वये पंचायत समिती दर्यायापूरची स्थापना १ मे १९६२ रोजी झाली.पंचायत समितीचे भौगोलिक क्षेत्रफळ ८१०७०.८८ हेक्टर असून पडीत क्षेत्रफळ ५७७३.५१ हेक्टर आहे.लागवडी खालील क्षेत्रफळ ७५२९७.३७ हेक्टर आहे.खरीप हंगामाचे क्षेत्रफळ ७३६७५.०१ हेक्टर असुन रब्बी हंगामाची क्षेत्र १५९८०.९० हेक्टर आहे.पंचायत समिती दर्यापूर अंतर्गत सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या १,३९,५९८ असून त्यापैकी ७१०९० पुरुष व ६७५०८ स्त्रिया आहेत.
पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात एकूण १४९ गावांचा समावेश आहे.१४९ गावांपैकी १३३ गावे आबाद असून १५ गावे उजाड आहेत. एकूण ग्रामपंचायती ७४ असून ३० स्ववतंत्र व ४४ गट ग्रामपंचायती आहेत.पंचायत समिती अंतर्गत एकूण १३३ गावांना महाराष्ट्र जीवन प्राधिकरणा द्वारे शुद्ध पाणी पुरवठा करण्यात येतो.
पंचायत समिती अंतर्गत एकूण १२९ शाळा कार्यरत असून त्यापैकी वर्ग १ ते ५ पर्यंतचे ८५ शाळा आहेत.वर्ग १ ते ८ च्या ४३ पुर्व माध्यमिक शाळा आहेत.जिल्हा परिषदचे १ हायस्कुल आहे.प्राथमिक आरोग्य केंद्र ४ आहेत.ग्रामिण रुग्णालय १ असुन २३ आरोग्य उपकेंद्र आहेत.प्राथमिक स्वास्थ पथक १ आहे.७ आयुर्वेदिक दवाखाने कार्यरत असुन २ अलोपॅथिक दवाखाने आहेत.पशुवैद्यकिय दवाखाना श्रेणी १ चे १ व श्रेणी २ चे ७ असे एकुण ८ दवाखाने कार्यरत आहे.पंचायत समिती पंचायत समिती अंतर्गत कार्यरत अंगणवाड्यांची एकुण संख्या २०४ असुन त्यापैकी नियमित १९० व १४ मिनी अंगणवाडी केंद्र आहेत.

श्री.कालिदास रघुनाथ तापी
मा.गटविकास अधिकारी
पंचायत समिती दर्यापूर
जाहिराती / महत्वाच्या सूचना
सन २०२४-२५ या वर्षात पंचायत समिती सेसफंडातून १४ समाजकल्याण २०%(टक्के) निधीतून 90%(टक्के) अनुदानावर मागासवर्गीय महिलांना पिको फॉल मशीन पुरवणी व ५%(टक्के) दिव्यांग योजनेचा थेट लाभ हस्तांतरण (डीबीटी) पद्धतीने लाभ देण्याबाबत.
एका दृष्टीक्षेपात
तालुक्याचे नाव : दर्यापूर
जिल्हा : अमरावती
देश : भारत
राज्य : महाराष्ट्र
विभाग : विदर्भ
क्षेत्रफळ : ८१०७०.८८ हे.
लोकसंख्या : १३९५९८
एकूण गावे : १४९
एकूण ग्रामपंचायती : ७४
एकूण उजाड गावे : १५
एकूण प्रभाग :
एकूण गण :
सार्वजनिक सुविधा
प्राथमिक आरोग्य केंद्र : ४
सामान्य रुग्णालय : १
जि. प. प्राथमिक शाळा : ८५
जि. प. माध्यमिक शाळा : ४३
आरोग्य उपकेंद्र : २३
अग्निशमन केंद्र :
अंगणवाडी : २०४
टपाल :
विज उपकेंद्र :
एकूण बँक : ४०

श्री. देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस
माननीय मुख्यमंत्री

श्री. एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे
माननीय उपमुख्यमंत्री

श्री.अजित आशाताई अनंतराव पवार
माननीय उपमुख्यमंत्री

श्री. जयकुमार कमल भगवानराव गोर
माननीय मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. चंद्रशेखर प्रभावती कृष्णराव बावनकुळे
माननीय पालक मंत्री

श्री. योगेश ज्योती रामदास कदम
माननीय राज्य मंत्री, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्री. बळवंत सीताबाई बसवंत वानखडे
माननीय खासदार, अमरावती लोकसभा मतदारसं

श्री. गजानन मोतीराम लवटे
माननीय आमदार, दर्यापूर विधानसभा मतदारसंघ

श्री. एकनाथ डवले भा.प्र.से.
प्रधान सचिव, ग्रामविकास व पंचायतराज विभाग

श्रीमती.श्वेता सिंघल , भा.प्र.से.
विभागीय आयुक्त, अमरावती विभाग

श्री. सौरभ कटियार, भा.प्र.से.
जिल्हाधिकारी अमरावती

सौ. संजीता महापात्र भा.प्र.से.
मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद अमरावती
पर्यटन स्थळे
आमच्या तालुक्याला काय खास बनवते


आनंदेश्वर मंदिर, लासूर दर्यापुर
आनंदेश्वर मंदिर
महाराष्ट्रातील अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर तालुक्यातील लासूर गावात असलेले आनंदेश्वर मंदिर हे प्राचीन दगडी स्थापत्यकलेचे एक उल्लेखनीय उदाहरण आहे. पूर्णा नदीच्या काठावर वसलेले हे काळ्या दगडाचे मंदिर दुरून एखाद्या किल्ल्यासारखे दिसते.
भगवान शिवाला समर्पित, हे मंदिर १३ व्या शतकाच्या आसपास बांधले गेले असे मानले जाते. त्याची स्थापत्य शैली हेमाडपंती डिझाइनची आठवण करून देते, ज्यामध्ये गुंतागुंतीचे दगडी कोरीवकाम आणि उंच व्यासपीठ आहे. मंदिराच्या आतील भागात १२ उघडे खांब आणि भिंतींमध्ये ६ खोदलेले आहेत, एकूण १८ खांब आहेत जे गणितीय अचूकता आणि खगोलशास्त्रीय महत्त्व यांचे मिश्रण दर्शवितात.
आनंदेश्वर मंदिर भारतीय पुरातत्व सर्वेक्षणाने राष्ट्रीय महत्त्वाचे स्मारक म्हणून मान्यता दिली आहे. हे या प्रदेशातील एक महत्त्वाचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक ठिकाण आहे, जे पर्यटकांना आणि भाविकांना आकर्षित करते, विशेषतः महाशिवरात्रीसारख्या उत्सवांमध्ये.
या प्राचीन चमत्काराचा शोध घेण्यास इच्छुक असलेल्यांसाठी, हे मंदिर दर्यापूरपासून अंदाजे १४ किलोमीटर आणि अमरावतीपासून सुमारे ६७ किलोमीटर अंतरावर आहे. दर्यापूर ते म्हैसांग मार्गाने हे ठिकाण उपलब्ध आहे
महिमापुर ची ऐतिहासिक सात मजली पायविहिर
छायाचित्र दालन









यशोगाथा



माझी वसुंधरा
माझी वसुंधरा हा सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाद्वारे हाती घेण्यात आलेला एक उपक्रम आहे. महाराष्ट्रातील नागरिकांना हवामान बदल आणि पर्यावरणीय समस्यांच्या परिणामांबद्दल जागरूक करण्यासाठी.

जल जीवन मिशन
जल जीवन मिशन हा भारत सरकारचा एक महत्वाकांक्षी उपक्रम आहे.जो २०१९ सुरु करण्यात आला.या योजने अंतर्गत २०२४ पर्यंत प्रत्येक ग्रामीण घरात नळाद्वारे शुद्ध पाणी पुरवठा करण्याचे उद्दिष्ट् आहे.

प्रधान मंत्री आवास योजना - ग्रामीण
स्वातंत्र्यानंतर लगेचच निर्वासितांच्या पुनर्वसनाने देशातील सार्वजनिक गृहनिर्माण कार्यक्रम सुरू झाला आणि तेव्हापासून, गरिबी निर्मूलनाचे साधन म्हणून सरकारचे हे एक प्रमुख लक्ष केंद्रीत क्षेत्र आहे.